नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात नोकिया ब्रँडचे फोन बनवणाऱ्या HMD ने आपला नवीन HMD Key हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीचा नवीन फोन Android 14 (Go Edition) सह येतो. ब्रँडने ते निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला आहे.
HMD च्या या स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 60Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यात क्वाड कोड Unisoc 9832E प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 460 Nits च्या पीक ब्राइटनेसही मिळत आहे. हा स्मार्टफोन Unisoc 9832E क्वाड कोर प्रोसेसरवर काम करतो. फोन 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येतो. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येते. यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट Android 14 (Go Edition) वर काम करतो. यात 8MP ऑटो फोकस रियर कॅमेरा आहे, जो LED फ्लॅशसह येतो.
दरम्यान, कंपनीने 5MP सेल्फी कॅमेराही दिला आहे. यामध्ये स्मार्ट फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ आणि खाली पोर्टेड स्पीकर आहे. हँडसेटला उर्जा देण्यासाठी, 4000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये मिळत आहे. IC ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक हे दोन पर्याय असणार आहेत.