प्रमोद आहेर
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत संवेदनशील व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माठ गावच्या उपसरपंचपदी हितेश घेगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच मच्छिंद्र घेगडे यांनी ठरलेला कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे सदर पद रिक्त झाले होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया माठ ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अरुणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.4) पार पडली.
या निवडणूक प्रक्रियेत हितेश घेगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच पवार यांनी हितेश घेगडे यांनी उपसरपंचपदी बिनविरोध झाल्याची घोषणा केली. तर या निवडणूक प्रक्रियेत ग्रामसेवक संदीप लगड यांनी शासकीय कामकाज पाहिले.
यावेळी सरपंच अरुणा पवार, माजी सरपंच सुधीर घेगडे, मच्छिंद्र घेगडे, स्वाती घेगडे, अश्विनी घेगडे, दादाभाऊ धुळे, सागर बोरगे, रुपाली देविकर, हौसबाई खेडकर, माधुरी घेगडे, रेवजी घेगडे, माजी उपसरपंच उमेश घेगडे, विलास घेगडे, संजय शेळके, अश्रू खेडकर, आप्पासाहेब खेडकर, अमोल देवीकर, विश्वनाथ घेगडे, दशरथ पंदरकर, संपत यादव, रावसाहेब पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
गावातील सर्व गट तट विसरून नागरिकांच्या समस्या सोडविणार आहे. शासनाच्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गावाचा सर्वांगीण विकास गाव हायटेक करणार आहे. असे निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच हितेश घेगडे यांनी सांगितले.’