सुरेश घाडगे
परंडा : अतिवृष्टी अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावे. अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी यासंदर्भात उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना आज रविवारी (ता. ६ ) निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया चालु आहे. परंतु शेतकऱ्यांकडुन मोबाईल क्रमांक व आधार कार्ड ची जिल्हा प्रशासनाकडुन सक्ती केली जात आहे. या कारणास्तव अतिवृष्टी अनुदान वितरीत करण्यास स्थगिती दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही सुचना शासन स्तरावरुन देण्यात आलेल्या नाहीत. तरी अशा अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता अनुदान वितरीत करण्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.