वजन कमी आणि वेट मेन्टेन ठेवण्यासाठी अनेक जण दिवस-रात्रविचार करत असतात. व्यायामासह आहाराकडे विशेष लक्ष देतात. पण बाहेर गेल्यावर अनेकदा त्यांना बाहेरच खाण्याची इच्छा होते. हॉटेलमध्ये जावून विविध पदार्थ खातात. पण बाहेरचं चमचमीत जेवण खाल्ल्याने वजन वाढते. कारण यात भरपूर प्रमाणात तेल, मसाले वापरले जातात. म्हणून हेल्थ फ्रीक्स मन मारून चमचमीत पदार्थ खाणे टाळतात.
जर आपल्याला मन मारून जगायचे असेल आणि आवडीचे पदार्थ खायचे असतील तर, आहारतज्ज्ञ काही टिप्स फॉलो करा असे सांगतात. कोणत्या या टिप्स आहेत. ज्यामुळे बाहेरचे चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही, ते पाहूयात.
- जर आपण हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर, प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील. पदार्थातील पौष्टीक घटकांमुळे वजनही वाढणार नाही.
- जर आपल्याला मन न मारता, हॉटेलमधलं चमचमीत पदार्थ खाऊनही वजन वाढू नये असे वाटत असेल तर, ४-३२-१ चा वेट लॉस रूल फॉलो करा. म्हणजे १ घास ३२ वेळा चावणे, असे फक्त ४ वेळा करा. या वेट लॉस रूलमुळे वजन तर वाढणार नाही, शिवाय पचनक्रियेतही अडथळे येणार नाही.
- डिनरनंतर शतपावलीला जरूर जा. किमान 30 मिनीटे चाला. निदान १०० पावले चाला. यामुळे वजन वाढणार नाही, शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल.
- लंच टाईममध्ये हॉटेलमधलं खा. कारण आपली दिवसभरात बरीच हालचाल होते. ज्यामुळे ते जीरत आणि वजन वाढत नाही. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा. जर आपल्याला हॉटेलमध्ये डिनर करायचा असेल तर, बेडटाईमच्या ३ तास आधी डिनर करा.
- बऱ्याचदा जेवल्यानंतर अपचनाची समस्या निर्माण होते. असे होऊ नये म्हणून जेवणाच्या निवडीवर नियंत्रण ठेवा. आल्याचे पाणी प्यायल्याने अपचन दूर होईल. शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल.
- जर आपल्याला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर, तर स्वीट डिशमधले फक्त ४ चमचे खा. यामुळे आपले मन भरेल, शिवाय जास्त खाणेही टाळले जाईल.