Health News : आपलं वजन नेहमी नियंत्रणात असावं. कारण वाढतं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण असतं. त्यामुळे वेळीच वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य तो उपाय केला पाहिजे. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतं.
घरगुती उपाय :-
तळलेल्या खाद्यपदार्थांपासून राहा दूर
मिठाई, तळलेले खाद्यपदार्थ, गोड पेय यापासून दूर राहा. नेहमीच्या जेवणामध्ये आणि दिनक्रमामध्ये तुम्ही काही सोपे बदल केले तर वजन कमी करण्यासाठी निश्चित तुम्हाला मदत मिळू शकेल. नियमित कॅलरीच्या 50 टक्के कॅलरी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खा. कारण यावेळी तुमची पचनक्रिया अधिक मजबूत असते.
कोमट पाणी वाढवते चयापचय शक्ती
जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कोमट पाण्यामुळे शरीरामधील चयापचय शक्ती अधिक वाढते आणि यामुळे वजन कमी करण्यास भरपूर मदत मिळू शकते. तसेच शरीर हायड्रेट देखील राहते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटामध्ये जमा होणारी अतिरिक्त चरबी यामुळे कमी होण्यास अधिक मदत मिळते.
मेथीच्या पाण्याचे सेवन
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा. सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचं सेवन करा. असे केल्यास काही दिवसांमध्येच पोटाची चरबी कमी होण्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.