Health News : पुणे : निरोगी आरोग्य असावं असं सर्वांनाच वाटत असतं. पण असे काही आजार आहेत त्याची काळजी घेतली तरी उद्भवतातच. त्यापैकी एक म्हणजे अस्वस्थ वाटणे. जेव्हा केव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा काय करावं, काय नाही हे समजतच नसतं. मात्र, असे काही उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
जेव्हा कधी अस्वस्थ वाटत असेल तेव्हा स्वत:ला रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कोमट पाण्याने अंघोळ, नियमित योगा करणे, सायलंट म्युझिक ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा आवडती गोष्ट केल्यास फायदा होऊ शकतो. तुमचं मन गुंतवून ठेऊन तुम्ही एंझायटीवर मात करू शकाल. एंझायटी अटॅकदरम्यान तुमचे विचार नकारात्मक होऊ शकतात. त्यामुळे आपलं मन स्थिर ठेवायचा प्रयत्न करा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा आणि पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस ठेवा. नाकातून हळूवार श्वास घेणे, श्वास सोडणे, काही सेकंदासाठी श्वास घेणे थांबवणे आणि तोंडाने श्वास घेणे हे सुद्धा तुम्हाला एंझायटीला दूर ठेवण्यास मदत करतात.
तुम्हाला एंझायटी अटॅक येतो तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा सपोर्ट तुम्हाला धैर्य देतो. अशावेळी आपल्या मित्रांशी, कुटुंबासोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोला. डॉक्टरांना वेळोवेळी संपर्क साधा. एंझायटीचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्याचे लक्षणे सुरवातीला जाणून घ्या. हृदयाचे ठोके वाढणे, घाम फुटणे, थरथर कापणे, अंगावर काटे येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, निराश वाटणे ही त्याची लक्षणे आहेत. हे जाणवताच डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधा. खोलवर श्वास घेणे हा एंझायटीपासून सुटका मिळवण्याचा चांगला मार्ग आहे.