सुरेश घाडगे
परंडा : मुलींचा प्राथमिक शिक्षणाचा स्तर उच्च शिक्षणापर्यंत टिकवून ठेवला पाहिजे. मुलींना शिक्षणासोबत संस्कार देण्याचीही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा आशा मोरजकर यांनी केले.
पिंपरखेड (ता. परंडा) येथील ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. १८) महिला जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशा मोरजकर बोलत होत्या.
यापुढे बोलताना मोरजकर म्हणाल्या,”मुली आणि त्यांच्या मातांमध्ये आरोग्य व मासिक पाळीविषयी गैरसमज, शरीराच्या या अवस्थेबद्दलच्या पुरेशा शास्त्रीय माहिती अभावी स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही. आरोग्य दृष्टिकोनातून मासीक पाळीच्या दिवसात योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. काळजी न घेतल्यास कॅन्सरसारखे गंभीर आजार उदभवू शकतात ”
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाउपाध्याक्षा अपेक्षा पाटील, पिंपरखेडचे सरपंच नागनाथ थोरात, ग्रामसेविका रूपाली माने, बचत गटप्रमुख आशा कोळी ग्रामपंचायत सदस्या वैशाली थोरात, सिंधु मस्के, सुरेखा थोरात, शालन कोळी, दिपाली देशमुख, मनिषा गोफणे, निर्मला पाटील, सुरेखा पाटील, राहिबाई पाटील, राणी काकडे, ज्योती काकडे, रेश्मा घनवटे, सुंदरबाई वाघमोडे, अनिता गोफणे, मनुबाई काकडे, कावेरा उमाप, स्वाती लिमकर, सोनाली गोफणे, विजयमाला काकडे, कुंदा देशमुख, मुक्ता लिमकर, दिपाली माने, सुभद्रा लिमकर, हिराबाई नाईकवाडी, संगीता नरूटे, दिपाली घनवटे, भाग्यश्री थोरात, सुवर्णा सुर्यवंशी, मालन थोरात, साधना काकडे, रोहिनी सुर्यवंशी, मंगल मोहिते, शकुंतला सुर्यवंशी, कौशल्या थोरात, सोनाली कोळी, काशिबाई सुर्यवंशी, आलका थोरात, सविता गोफणे, जयश्री गोरे, दैवशाला पाटील, स्वाती घनवटे, रूपाली बारसकर, सिंधु मस्के, नंदा मस्के, रेनुका कोळी, मोनिका कोळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली माने यांनी केले तर आभार सिंधु मस्के यांनी मानले.