केज: दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना एका शाळेच्या मुख्याध्यापकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील खासदार रजनीताई पाटील यांच्या संस्थेतील सोनवणे नामक मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडे दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने सापळा लावला आणि तीन हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख युनूस, श्रीराम गिराम आदींनी केली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातत्याने लाचखोरीच्या घटना उघडकीस येत असल्याने लाचखोरांचा जिल्हा अशी बीडची ओळख होऊ लागली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.