मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक अशी ओळख असलेल्या एचडीएफ बँकेची आर्थिक वाटचाल वेगाने सुरु आहे. त्यातच एचडीएफसी बँक आता AU Small Finance Bank मधील मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने HDFC बँकेला AU Small Finance Bank मधील जास्तीत जास्त 9.50% हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
याबाबतचा करार आरबीआयकडून मंजूरी पत्र मिळाल्यानंतर एका वर्षात पूर्ण होईल. या कालावधीत ही अट पूर्ण न केल्यास आरबीआयचे मंजूरी पत्र रद्द केले जाईल, अशी माहिती समोर आली आहे. AU स्मॉल फायनान्स बँक (SFB) ला 3 जानेवारी 2025 रोजीच्या RBI पत्राची प्रत प्राप्त झाली आहे, ज्यात HDFC बँक आणि तिच्या समूह संस्थांना (HDFC म्युच्युअल फंड, HDFC लाइफ इन्शुरन्स, HDFC पेन्शन मॅनेजमेंट, HDFC ERGO जनरल इन्शुरन्स आणि HDFC सिक्युरिटीज) मंजूरी देण्यात आली आहे.
पेड-अप शेअर कॅपिटलच्या 9.50% पर्यंत किंवा AU SFB चे मतदान हक्क एका वर्षात मिळवण्यासाठी दिले जाते. HDFC बँकेने एक्सचेंजेसला असेही सांगितले की, कोटक महिंद्रा बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेत एकूण 9.5% पर्यंत हिस्सा घेण्यास RBI कडून मान्यता मिळाली आहे. दरम्यान, एचडीएफसी बँक समूह घटकांसाठी निर्धारित 5 टक्के मर्यादा ओलांडण्याच्या शक्यतेमुळे एचडीएफसी बँक या बँकांमध्ये गुंतवणुकीच्या विचारात नसल्याचीही माहिती आहे