पुणे : मिरज-लोंढा स्थानक दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने सहा रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली आहे.
२२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सहा रेल्वे रद्द केले आहे. तर दोन रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागात मिरज-लोंढा स्थानक दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान सहा रेल्वे रद्द केल्या आहेत, तर दोन रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. हजरत निजामुद्दीन-मैसूर एक्सप्रेसचाही मार्ग बदलला असून ही रेल्वे पुणे-दौंड-सोलापूर-होटगी-गदग-हु बळी आदी मार्गाने धावणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे पुढीलप्रमाणे-
हुबळी-मिरज, मिरज-लोंढा-मिरज, मिरज-कॅसल रॉक-मिरज एक्स्प्रेस तसेच २२ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मिरज-हुबळी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.
तर २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस ही आपल्या निर्धारित मार्गाने न धावता मडगाव-माजोर्डा- मदुरै-रोहा-पनवेल-कर्जत-लोणावळा या मार्गाने धावेल.