उरुळी कांचन : नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शिक्षकांचे सक्षमीकरण करण्यासाठी व शिक्षकांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने हवेली तालुका शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी (ता.६) मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हवेलीचे गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अस्मिता चॅरिटेबल फाउंडेशनचे संस्थापक व माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन लाभले होते. यावेळी हवेलीचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगताप, भरत इंदलकर, शंकर मुंढे, राधा पाचपुते, प्राचार्य भोसले व हवेली तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी विविध प्रकारच्या सोळा स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत हवेली तालुक्यातील विविध बीटमधुन तालुका स्तरावर आलेल्या प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंचा सहभाग होता. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त शिक्षकांना हवेली शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन शिंदवणे केंद्रांचे केंद्रप्रमुख चिंतामण अद्वैत व केंद्र समन्वयक सारिका ताटे यांनी केले. तर संपूर्ण स्पर्धेचे संचलन युवराज ताटे यांनी केले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांचे नावे (कंसात स्पर्धेचे नाव, शाळा व बीट)
किशोर भिमा भोसले (चित्रकला -विठ्ठलवाडी, लोहगाव), अनिल शिवाजी वाडेकर (वक्तृत्व – केसनंद), ज्ञानेश्वर गायकवाड (कथाकथन – वाघमारे वस्ती, पेरणे), उज्वला नांदखिले (निबंध स्पर्धा – रामोशी वाडी, कुंजीरवाडी), सत्तार बादशहा तांबोळी (स्वरचित कविता – आगळंबे, सांगरुन), मेमाणे दत्तात्रय परशुराम (गीत गायन -लोणी काळभोर), पल्लवी गोरख सूर्यवंशी ( रांगोळी स्पर्धा – मोकरवाडी- देहू), राधाकिसन जोंधळे (पोवाडा-मांजरी खुर्द, केसनंद), वनवे विजय चंद्रकांत (व्हिडिओ निर्मिती – वडू खुर्द, लोणीकंद), निवेदिता काटकर (शैक्षणिक साहित्य – होळकरवाडी,लोणी काळभोर), प्रीती सुधीर कामठे (कागद काम- लोणी काळभोर), उज्वला नामदेव उनवणे (पुस्तक समीक्षा , आव्हाळवाडी, वाघोली), संदीप गिते (प्रश्नमंजुषा -वाघोली), वाबळे दिपक (फलक लेखन – बारगळ वस्ती , लोणीकंद), सकट आशा राजाराम (धावणे – लोणीकंद) दावणे रामचंद्र (क्रिकेट – खेड शिवापुर संघ)