लोणी काळभोर : हवेली तालुक्यात ई फेरफार मंजूर अथवा नामंजूर करण्यासाठी मंडलाधिकारी स्तरावर “पुर्वालोकन योग्य दिसून येत नाही” हा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र खातेदारांच्या भेटीनंतर हा अडथळा दूर होत असल्याने, या ई फेरफार प्रणालीला खरोखरच गतिरोधक आहे की, निर्मित शेरा तयार करून “रिएंन्ट्री” साठी तलाठी स्तरावर पाठवला जातो. त्यामुळे या प्रक्रियेत कोणते गौडबंगाल दडलेले आहे. याविषयी खमंग चर्चा झडू लागली आहे.
सातबारा संगणकीय प्रणालीच्या युगात खातेदार शेतकऱ्यांच्या खाते नबंरमध्ये क्षेत्रच शिल्लक नसेल तर कोणताही हस्तांतरणाचा नोंदणीकृत दस्त होत नाही. पुर्वीसारखे इंडेक्स टू वरुनही खरेदीखत नोंदवले जात नाही. संगणकीय सातबारावर खातेदाराचे नाव व क्षेत्र नमूद असेल तरच हस्तांतरित रजिस्टर दस्ताची नोंदणी ई म्युटेशन द्वारे केली जाते. मात्र असे असतानाही संबंधित फेरफार मंडलाधिकारी स्तरावर निर्गत होणेसाठी क्षेत्राचा मेळ बसत नाही. अथवा खातेदारांच्या नावे क्षेत्र शिल्लक नाही. असा शेरा होत असल्याने हा सिस्टीम एरर आहे की निर्मित एरर आहे. याविषयी शंका वाढू लागली आहे.
दरम्यान, हवेली तालुक्यात क्षेत्राचा मेळ बसत नाही, खातेदारांच्या नावे क्षेत्र शिल्लक नाही असा शेरा फक्त काही खरेदीच्या फेरफारांना येत आहे. त्यामुळे फेरफार निर्गत होण्याच्या आकडेवारीवर परिणाम दिसून येत आहे. मात्र संबंधित खातेदार मंडलाधिका-यांना समक्ष भेटल्यावर फेरफार मंजूर होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी हा शेरा सिस्टीम मधून येत आहे की कार्यालयीन निर्मित शेरा आहे. याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
ग्राहक कल्याण फौंडेशनच्या सचिव स्मिता कांबळे म्हणाल्या, पुर्वालोकन योग्य दिसून येत नाही, खातेदारांच्या नावे क्षेत्र शिल्लक नाही असा शेरा ठेवलेल्या फेरफारांची माहिती मंडलाधिकारी स्तरावर दिली जात नाही. फेरफारास शेरा आल्यानंतर समक्ष भेटल्यावर फेरफार रद्द केल्यास प्रांताधिकारी कार्यालयात अपील दाखल करावे लागेल व त्यासाठी एक वर्षाचा कालावधी जाईल असे सांगून आर्थिकरित्या चिरमिरीची पुर्तता केल्यास प्रस्तुतचा शेरा गायब होऊन फेरफार मंजूर केला जात असल्याचा धक्कादायक अनुभव आहे.
माजी राज्य समन्वयक रामदास जगताप, खातेदारांच्या नावे क्षेत्र शिल्लक नाही, पुर्वालोकन योग्य दिसत नाही व क्षेत्राचा मेळ बसत नाही असा फेरफारास शेरा ठेवणे पुर्णतः चुकीचे असून शोधलेली पळवाट आहे. अशी ई फेरफारची आज्ञावली आहे.