पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चानां आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोर आला आहे.या महिन्यात शेवटी म्हणजेच 29 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे.या बैठकीमुळे या चर्चेला नव्याने उधाण आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जेष्ठ नेते शरद पवार यांनी बोलवलेल्या या बैठकीत पक्षाच्या भवितव्याबाबत आणि विलिनीकरणाच्या शक्यतेवर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अंतर्गत रणनीती आणि पुढील राजकीय वाटचालीवर सविस्तर मंथन होणार आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून, या बैठकीनंतरच विलिनीकरणाचे चित्र स्पष्ट होईल.

तसेच आगामी स्थानिक व जिल्हा परिषद निवडणुका तद्वतच पक्षांतर्गत रणनीतीबाबत या कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








