मुंबई: भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी- शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेले इंदापूरचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. प्रशासन सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्याबाबतची घोषणा केली.
पाटील हे शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशादरम्यान पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना अदृश्यपणे आपण मदत केल्याचे होते. त्यांची या विधानाची राजकीय वर्तुळात म्हटले मोठी चर्चा झाली होती. कदाचित पाटील यांच्या मदतीमुळेच शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन सन्मान दिल्याचे बोलले जात आहे.
पक्षाकडून शनिवारी दि (दि. १९) पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला हर्षवर्धन पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत विधानसभेचे जागावाटप, उमेदवारांची संभाव्य यादी तयार करणे, यावर चर्चा होणार असल्याचे समजते.