इंदापूर : भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एन.सी.डी.सी.) जनरल कौन्सिलवर राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या संबंधीची अधिसूचना केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 2 फेब्रु.24) प्रसिद्ध केली. देशाचे गृहमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशभरात पुण्यासह 18 विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज केले जात आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलवर सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.