युनूस तांबोळी
शिरुर: साहेब, अचानक झालेल्या पावसाने संसार उध्वस्त झाला. दुष्काळ व्हता तवा तुम्हिच छावणि करून जनावर वाचवलीत. पण ढग फुटीने कुटुंब रस्त्यावर आले. आता मदत तुम्हिच करा. अशी मदतीची अपेक्षा माजी गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील नागरिकांनी केली होती. त्याला प्रतीसाद देत आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी एक हाथ मदतीचा उपक्रम राबविला आहे.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे ढग फुटी मुळे तलाव फुटून संसार पाण्यात वाहून गेला. या कुटूंबाना संसार उपयोगी वस्तूचे किट देऊ केले आहे. त्यातून या नागरिकांना लाख मोलाची मदत होणार आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे , आंबेगाव शिरुर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणिस बबनराव शिंदे, माजी सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती प्रकाश पवार , सरपंच चंद्रभागा खर्डे , आसीया तांबोळी, मोहन पुंडे , आबीद तांबोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन दिपक तळोले यांनी केले. बंडू पुंडे यांनी आभार मानले.
माजी गृहमंञी दिलीप वळसे पाटील म्हणाले कि, शिरूर तालूक्यातील कान्हूर मेसाई परीसरात नेहमीच दुष्काचे सावट होते. भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू होते. यावेळी भिमाशंकर कारखान्या मार्फत टँकर देण्यात आले. सत्तेत असताना या भागात जलसंधारणाची कामे करून तलाव व लहान लहान धरणे तयार करण्यात आली. यावर्षी पावसाच्या पाण्याने या भागातील पाण्याची पातळी वाढली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा.
यावेळी बोलताना आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणाले कि, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघावर माजी गृहमंञी दिलीप वळसे पाटिल यांचे नेहमीच लक्ष असते. त्यामुळे अचानक झालेल्या ढगफुटीला घाबरून न जाता. या संकटाशी नागरिकांनी सामना करावा. राष्ट्रवादि काँग्रेस पक्ष नागरिकांच्या पाठीशी उभा आहे.