पुणे : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी महामंडळाबद्दल घेतलेले निर्णय हे आगामी काळात रद्द होतील अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. यामध्ये महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटात 50 टक्के सवलत तर जेष्ठ महिलांना एसटीचा प्रवास मोफत केला होता. मात्र या दोन्ही योजनांचा एसटी तोट्यात ताण पडत असल्यास वारंवार सांगितलं जात. आता यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा खुलासा केला आहे. कोणत्याही योजना बंद पडणार नाहीत, मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
ज्या महिलांचे वय 75 वर्षापेक्षा अधिक आहे अशा ज्येष्ठ महिलांना राज्यभरात कुठेही मोफत प्रवास करता येतो. त्याचबरोबर महिला तिकिटामध्ये अर्धीच सूट देण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनाही पास च्या स्वरूपात सवलत दिली आहे. या सगळ्या योजनांमुळे एसटीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
माहिती जनसंपर्क विभागाकडून कालच काही टेंडरची माहिती प्रकाशित करण्यात आली होती.. एसटी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय किंवा परिवहन व्यवस्थापक ज्यांच्याकडे सध्या चार्ज आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय अशी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण चुकीच आहे असं स्पष्ट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.