Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Money Scam: हडपसर येथील समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळीचे गुंतवणूकदारांना आता 10 टक्केऐवजी 3 टक्के परताव्याचे नवीन गाजर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 November 2025, 17:56
Hadapsar Money Scam: Prashant Gawli, the founder of Samarth Crop Care in Hadapsar, now offers investors a new carrot of 3 percent return instead of 10 percent.

Photo-Social Media

पुणे : हडपसर (पुणे) येथील समर्थ क्रॉप केअरने (Hadapsar Money Scam) फसव्या योजनेअंतर्गत (Pune News) हजारो गुंतवणूकदारांकडून बेहिशेबी माया गोळा केली आहे. गुंतवणूकदारांना 10 टक्के परताव्याचे आमिष दाखविले होते. परंतु मागील चार महिन्यांपासून या संस्थेचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे अचानक कोसळला आहे. संस्थेची सर्व आर्थिक गणिते कोलमडल्याने गुंतवणूकदारांची तोंडे तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यासाठी 3 टक्के परतावा देण्याचे नवीन आमिष दाखवले आहे. गुंतवणूकदारांच्या विश्वासास पात्र न ठरल्यामुळे 3 टक्के परतावा मिळणार की नाही. की हा एक फसवणुकीचा नवीन जुमला तर नाही ना? त्यामुळे 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचे भविष्य अंध:कारात सापडले आहे.

 

समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळीने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी चार दिवसापूर्वी गुंतवणूकदारांचा चौफुला (ता.दौंड) येथील स्वराज्य मंगल कार्यालयात मेळावा घेतला. तेव्हा सध्याची वेळ मारून नेल्यासाठी गुंतवणूकदारांना वरीलप्रमाणे नवीन गजर दाखवले आहे. हा मेळावा म्हणजे गुंतवणूकदारांना विश्वास संपादन करण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. परंतु, गुंतवणूकदारांना परतावा सोडा मूळ मुद्दलही मिळणे कठीण असल्याचे एकंदरीत सर्व परिस्थितीवरून दिसून येत आहे.

यावेळी प्रशांत गवळी याच्यासोबत असलेल्या बगलबच्च्यांनी व खुश्कमस्कऱ्यांनी त्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भामटेबाजी आणि दिखावेबाजी करणाऱ्या प्रत्येक ठगाच्या पाठीमागे असे काही चमचे नेहमी काम करतअसतात. ते सध्याची बिकट परिस्थिती सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करतात. हा त्यातीलच एक प्रकार म्हणावा लागेल. गवळी यावेळी म्हणाला की, सध्या आर्थिक अडचणी आल्या आहेत. पण त्या तापुरत्या आहेत. कंपनी सर्व गुंतवणूकदारांना न्याय देणार आहे. कोणाचाही पैसा बुडविणार नाही. फक्त मला थोडा अवधी द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यामुळे मी कुठेही असलो तरी तुमच्या खात्यात पैसे येतील.

समर्थ क्रॉप केअरने शेतमाल एक्सपोर्ट करण्याच्या नावाखाली 45 हजाराहून अधिक गुंतवणूकदारांकडून 4 ते 5 हजार कोटी रुपये बेकायदा जमा केले आहेत. प्रशांत गवळी याच्याकडे एवढी कोट्यावधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा असतानादेखील गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक कुठल्या कंपनीमध्ये आहे. याची काडीमात्रसुद्धा त्यांना कल्पना नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इथून मागच्या फसव्या योजनांचा अनुभव पाहता, एकाही कंपनीने कुठल्याच गुंतवणूकदारांचे परतावा सोडा मूळ मुद्दलही परत केलेली नाही.

दरम्यान, या प्रकारच्या फसव्या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना मूळ मुद्दल मिळण्याची कधीच “शाश्वती” नसते. कारण या योजनेचा मूळ हेतू साखळीपद्धतीने पैसे गोळा करणे, सुरवातीला काही महिने परताव्याचे आमिष दिले जाते. परंतु, साधारणता 19 ते 20 महिने हे ठग पैसे गोळा करण्यासाठी नाना क्लुप्त्या वापरतात. ठराविक वेळेनंतर गुंतवणुकीचा ओघ कमी झाला आणि परताव्याचा वेग वाढला की, ठराविक रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यानंतर हे ठग गाशा गुंडाळून परदेशात पोबारा करतात. हा इथून मागच्या सर्व प्रकरणांचा इतिहास आहे.

पुणे प्राईम न्यूजकडून नेहमीच समाजहिताची पत्रकारिता

मागील चार महिन्यांपासून समर्थ क्रॉप केअरने कुठल्याही गुंतवणूकदाराला एक छदामही परतावा दिला नाही. पुणे प्राईम न्यूजने भविष्यातील धोके ओळखून गुंतवणूकदारांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे या भूलभूलैय्याला बळी पडण्यापासून बरेच लोक वाचले. व या कंपनीत होणारी बेकायदा गुंतवणूक थांबली. अजूनही पुणे प्राईम न्यूजचे असे स्पष्ट मत आहे की, हा ठग कोणत्याही गुंतवणूकदारांना एक दमडीही देणार नाही. समर्थ क्रॉप केअरची सध्याची अवस्था म्हणजे सावरासावर करून दिवस पुढे ढकलणे होय. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. गवळी आणि त्याचे साथीदार पदेशात फरार होण्याअगोदर गुंतवणूकदरांनो, तुम्ही तुमच्या पद्धतीने मूळ मुद्दल काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. अन्यथा तुम्हाला कपाळावर हात मारून घ्यायची वेळ येईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या; पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची धडक कारवाई..

Wednesday, 1 April 2026, 10:40

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13
Next Post
Pune News: Dhangekar makes serious allegations against Muralidhar Mohol, conflict in Mahayuti flares up again

Pune News: धंगेकरांनी मुरलीधर मोहोळवर केले गंभीर आरोप, महायुतीतील संघर्ष पुन्हा चिघळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.