नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी iQOO ने आपला नवा Z9 Turbo हा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6400mAh ची बॅटरी देण्यात आली असून, यामध्ये 50 MP कॅमेराही असणार आहे. हा फोन 80W चार्जिंगला सपोर्ट करतो. Android 14 वर आधारित असून, OriginOS 5 स्किनवर हँडसेट काम करतो.
iQOO Z9 Turbo चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन लाँग बॅटरी लाईफ एडिशनसह मिळत आहे. कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोन 6400mAh बॅटरीसह येतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. कंपनीने एप्रिलमध्ये या हँडसेटच्या स्टँडर्ड वेरिएंटमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे.
iQOO Z9 Turbo Long Battery Life Edition चे बेस व्हेरिएंट 1899 युआन (अंदाजे 21,000 रुपये) च्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. ब्रँडचा हा फोन 12GB RAM + 512GB स्टोरेज, 16GB RAM + 256GB स्टोरेज आणि 16GB RAM + 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.