पुणे: महायुतीमध्ये हवी ती मंत्रीपदे मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती, तशीच शर्यत आता पालकमंत्रिपदासाठी पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा केल्याने त्याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे. सध्या महायुतीतील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरात पडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नेमकं या दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर येत आहे.
संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीत नागपूरचे पालकमंत्रिपद हे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना मिळेल. राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच पुण्याचे पालकमंत्रिपदही अजित पवारांकडे राहणार असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्र्यांची संभाव्य यादी
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
अकोला – आकाश फुंडकर
धुळे – जयकुमार रावल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार – अशोक वुईके
पालघर – गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
ठाणे – एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
हिंगोली – आशिष जैस्वाल
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
रत्नागिरी – उदय सामंत
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
भंडारा – मकरंद पाटील
चंद्रपूर – नरहरी झिरवळ