दिनेश सोनवणे
दौंड : कुरकुंभ (ता.दौंड) येथे महानिर्मिती, महापारेषण, महावितरणच्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
परिमंडळातील केडगाव विभागा अंतर्गत कुरकुंभ शाखा येथे संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये महिलांच्याही उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये एकूण १०२ बॅग रक्त संकलन करण्यात आले सर्व रक्तदात्यास संघटनेच्या वतीने पाच लिटरचे थंड पाण्याचे वॉटर जार भेट म्हणून देण्यात आले.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजेंद्रजी ऐडके (कार्यकारी अभियंता केडगाव विभाग) व महेशजी धाडवे (उपकार्यकारी अभियंता दौंड उपविभाग) यांच्या हस्ते व संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, कुरकुंभ चे सरपंच राहुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास संघटनेचे कल्याण धुमाळ , दत्तात्रय माहूरकर , शरणबसप्पा सोनकांबळे , ज्ञानेश्वर सावंत , धनाजी तावरे, राजेंद्र देहाडे, जैनुद्दीन आत्तार, मच्छिंद्र बारवकर, गोरख बारवकर, वसंत कुंभार, बापूराव नरुटे, उत्तम गायकवाड, दत्ता तावरे, प्रीतम गोंडोळे, सचिन खोमणे, महादेव दिवसे,पिंटू बनकर, मनोज कोळपे, प्रशांत काकडे, अभिजीत शितोळे, नामदेव गावडे, काका माळी, प्रवीण ढवळे, सुदाम साळवे,किरण जगताप, किरण पवार, राजेंद्र थोरात, सोमनाथ कांबळे, संदीप गाढवे, बंडू शितोळे, दिलीप डांबरे इत्यादीसह इतर कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमाचे संयोजन व कार्यक्रमाचे कांतीलाल मेरगळ (संपर्कप्रमुख केडगाव विभाग) यांनी केले. असेच विविध प्रकारचे कार्यक्रम संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून दरवर्षी राबवण्यात येतात. सर्व कामगार वर्गामधून त्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला जातो.