Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gram Panchayat Election Result 2023 : इंदापूर तालुक्यातील जनतेचा भाजपला कौल : हर्षवर्धन पाटील

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 6 November 2023, 14:56

Gram Panchayat Election Result 2023 : दीपक खिलारे / इंदापूर : इंदापूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालातून जनतेने भाजपला स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणुकीच्या निकालातून इंदापूर तालुक्यातील भाजपचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर सोमवारी (ता ६) दिली.

इंदापूर तालुक्यामध्ये बावडा तसेच वकीलवस्ती, शेळगाव, शिंदेवाडी, काझड, लाकडी या ६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये तालुक्यातील मोठी असलेली बावडा तसेच काझड, लाकडी या ३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद तसेच ग्रामपंचायत सदस्य संख्येतही भाजपने बहुमत मिळविले आहे. शेळगाव, शिंदेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने तर वकीलवस्ती येथे स्थानिक आघाडीने सत्ता मिळवली आहे.

बावडा गावच्या सरपंचपदी भाजपच्या पल्लवी रणजित गिरमे या तब्बल १४३२ मताधिक्याने निवडून आल्या आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या निवडणुकीतील भाजपच्या पॅनेलला मिळालेल्या मतांच्या आकडेवारीवरून भाजपला विरोधकांपेक्षा अधिकचे मतदान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीवरुन जनतेने भाजपला पसंती दिली आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

 

भाजपचे गावोगावचे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपच्या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदापूर तालुक्यात आगामी काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका जिंकून भाजप आपली ताकद दाखवून देईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, निवडणूक म्हटले की हार-जीत असते. त्यामुळे निवडणुकीचा विषय कार्यकर्ते व उमेदवारांनी आजपासून संपवून सर्वांनी एकत्रितपणे गावच्या विकासास हातभार लावावा, असे आवाहन केले. राज्यातील सत्तारूढ महायुती सरकारला जनतेने पसंती दिल्याचे सर्व ग्रामपंचायत निकालांतून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.

राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आजच्या निकालाप्रमाणे महायुतीच्या विजयाचा कौल कायम राहील, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune Crime : तरुणीची छेड काढून मारहाण करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल ; खडकी परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.