पुणे : भूमि अभिलेख विभागाचे पुणे जिल्हा अधीक्षक सुर्यकांत मोरे यांची उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न, जमाबंदी आयुक्त (एकत्रीकरण), पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासन आदेश उपसचिव आश्विनी यमगर यांनी 3 एप्रिलला जारी केले आहेत.
सुर्यकांत मोरे यांनी पुणे जिल्हा अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी पुणे जिल्हा अधीक्षकपदी एक वर्ष अधिकचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने त्यांनी पुणे जिल्हा अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते मार्च 2025 पर्यंत त्यांच्या कारभाराची तपासणी नुकतीच लावली आहे. त्या तपासणीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यातच त्यांची पदोन्नती उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न, जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे याठिकाणी झाली आहे.