नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक अॅप्स लाँच केले जात आहेत. त्यात सरकारी चॅनेल असलेल्या प्रसार भारतीने त्यांचे OTT प्लॅटफॉर्म WAVES लाँच केले आहे. Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात लाँच केलेल्या WAVES OTT मध्ये हे मिळू शकणार आहे.
सरकारी पब्लिक ब्रॉडकास्टरने डिजिटल स्ट्रीमिंगच्या जगात प्रवेश केला आहे. जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त हे प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला रेट्रो आधुनिक डिजिटल ट्रेंड पाहायला मिळेल. यावर तुम्हाला हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, कन्नड, मल्याळम, तेलुगू, तमिळ, गुजराती, पंजाबी आणि इतर भाषांमध्ये मिळू शकणार आहे. तुम्ही 10 भिन्न शैलींमधील कंटेंटचा आनंद घेता येऊ शकणार आहे.
WAVES OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्हिडिओ ऑन-डिमांड, फ्री-टू-प्ले गेमिंग, 65 लाईव्ह चॅनेलसह लाईव्ह टीव्ही स्ट्रीमिंग, रेडिओ स्ट्रीमिंग, ॲप इंटिग्रेशन आणि ONDC द्वारे ऑनलाईन शॉपिंगची सुविधा मिळणार आहे. या व्यासपीठावर तरुण सामग्री निर्माते देखील असतील ज्यांना राष्ट्रीय निर्माता पुरस्कार देण्यात आला आहे.
या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला रोल नं. 52, फौजी 2.0, किकिंग बॉल्स, जॅक्सन हॉल्ट, जाये आप कहाँ जायेंगे यांसारख्या लोकप्रिय शोचा अॅक्सेस मिळणार आहे. याशिवाय मंकी किंग: द हीरो इज बॅक, फौजा, भेद भरम, थोडे दूर थोडे पास, भारत का अमृत कलश, छोटा भीम, अकबर बिरबल आणि इतर ॲनिमेटेड कंटेंटमध्ये तुम्हाला अॅक्सेस मिळणार आहे.