Firefox Browser Data : सर्वजण मोझिला फायरफॉक्स ब्राउजर वापरतात असं नाही, पण जे वापरतात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. असा इशारा सरकारने दिला आहे. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये मोझिला फायरफॉक्स हे ब्राऊजर वापरत असाल, तर नक्कीच ही बातमी तुम्ही वाचाचं. या ब्राउजरच्या ठराविक व्हर्जनमध्ये असे बग्स आढळले आहेत, ज्यामुळे तुमचं डिव्हाईस हॅक होण्याचा धोका वाढत आहे.
सरकारच्या कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने याबाबत माहिती दिली आहे. Firefox ESR 115.5.0 यापूर्वीचे व्हर्जन्स, Mozilla Thunderbird 115.5 यापूर्वीचे व्हर्जन्स आणि Firefox iOS 120 यापूर्वीचे व्हर्जन्स वापरणं धोकादायक असल्याचं CERT-In ने म्हटलं आहे.
असा होऊ शकतो डेटा चोरी
या ब्राउजर व्हर्जन्समध्ये असणाऱ्या बग्समुळे फोन किंवा कम्प्युटरमध्ये मालवेअर प्रवेश करू शकतात. यामुळेच यूजर्सचा गोपनीय डेटा, बँकिंग डीटेल्स किंवा अशी बरीच माहिती चोरी होऊ शकते. यामुळेच सरकारने याबाबत खबरदारीचा इशारा दिला आहे.
अशी घ्या काळजी
हॅकिंगच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला फायरफॉक्स ब्राउजर वापरणं बंद करण्याची गरज नाही. यासाठी फक्त तुम्हाला तुमचं ब्राउजर अपडेट करावं लागणार आहे. असं कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितलं आहे. नवीन व्हर्जनमध्ये असणाऱ्या बग फिक्सेसमुळे डेटा चोरी होण्याचा धोका कमी होतो.