बेल्हे : जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचे हल्ले सुरूच असून, राजुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या गोह्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. राजुरी येथील गोंधळमळा शिवारात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील गोंधळमळा शिवारातील सुदाम सावळेराम औटी यांचा घराशेजारी गोठा आहे. सोमवारी (दि. १६) पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत खिल्लारी गायी व गोऱ्ह्यावर हल्ला करून गोठ्यातून गोऱ्याला फरफटत नेले. त्यानंतर सुदाम औटी यांना अचानक गायींचा हंबरण्याचा मोठा आवाज आला असता, ते घराबाहेर आले.
या वेळी बिबट्या त्यांच्या गो- ह्यावर हल्ला करून फरफटत घेऊन चाललेला दिसला. औटी यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. परंतु, या हल्ल्यात गोऱ्हा मुत्युमुखी पडला. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, राजुरी परिसरात दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असून, वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.