नवी दिल्ली : सध्या इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यानुसार, टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये अनेक वेब ब्राऊजरही आहेत. त्यात गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, ओपेरा, सफारी यांसारख्या वेब ब्राऊजरचा समावेश आहे. पण, जे युजर्स सध्या गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करत असतील तर त्यांच्यासाठी कंपनीने भन्नाट फिचर आणले आहे. त्यामुळे हे ब्राऊजर पुन्हा एकदा पसंतीचे असे ठरत आहे.
गुगलने क्रोम ब्राउझरमध्ये एक-दोन नव्हे तर पाच नवीन फिचर्स आणले आहेत. नवीन फिचर्स Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी आहेत. नवीन फीचर्सच्या माध्यमातून यूजर्सना सर्चिंगचा चांगला अनुभव घेता येऊ शकणार आहे. गुगलने लोकल सर्च रिझल्ट आणि ॲड्रेस बारला नवीन पद्धतीने डिझाईन केले आहे. यामुळे, नेव्हिगेशन खूप सोपे होणार आहे. त्यामुळे युजर्संना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा मिळतील.
याशिवाय, नवीन फिचर्स Chrome Action मुळे युजर्संचा वेळ वाचणार आहे. स्थानिक व्यवसायांशी संवाद साधणे खूप सोयीचे होणार आहे. ॲक्शन फीचरमधून यूजर्सना मोठी सुविधा मिळणार आहे. गुगल क्रोमच्या नवीन फीचर ॲक्शनमुळे युजर्सना पुन्हा पुन्हा सेटिंग्जमध्ये जावे लागणार नाही. या फीचरमध्ये युजर्सना कॉल, डायरेक्शन आणि रिव्ह्यू असे अनेक पर्याय मिळतील.
तसेच अँड्रॉइड, टॅब्लेट आणि आयपॅडसाठी गुगल ॲड्रेस बार मोठ्या स्क्रीनसह येईल. या फीचरच्या मदतीने जे युजर्स मोठ्या स्क्रीन असलेल्या टॅब्लेटवर काम करतात, त्यांना फायदा होणार आहे. यामुळे यूजर्सचा सर्च एक्सपीरियंस पूर्वीपेक्षा चांगला होईल.