नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात या वापरामुळे कंपनीकडूनही मोठी रॅम आणि इंटरनल स्टोरेज असलेले स्मार्टफोन आणले जात आहेत. पण, जर जास्त वापर झाला तरी हळूहळू स्मार्टफोन स्लो होतो. त्यामुळे काही ऍप्स, फोटोज् डिलिट करावे लागतात. मात्र, आता तुम्हाला असं काहीही करण्याची गरज भासणार नाही.
Google कडून Google Auto Archive आणण्यात आले आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून फोनची स्टोरेज वाढवता येऊ शकणार आहे. स्टोरेज फ्री करताना युजर्संना अनेकदा फोटो, व्हिडिओ आणि काही महत्त्वाच्या फाईल्स डिलिट कराव्या लागतात. पण आता हे करावं लागणार नाही. आता Google Auto Archive च्या माध्यमातून तुमची अडचण दूर होण्याची शक्यता आहे.
असं वापरता येईल फीचर…
- – सर्वप्रथम अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करा.
- – नंतर, वरच्या उजव्या बाजूला प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
- – हे केल्यानंतर, सेटिंग्ज पर्यायावर क्लिक करा.
- – यानंतर जनरल सेटिंगवर टॅप करा.
- – मग तुम्हाला थोडे खाली येऊन ऑटो आर्काइव्ह ॲप्स वैशिष्ट्याचे टॉगल चालू करावे लागेल.
- – असे केल्यावर, जे ॲप्स फोनमध्ये वापरले जात नाहीत ते आपोआप निष्क्रीय होतील आणि स्टोरेज वाढू शकणार आहे.