मुंबई : महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 2 कोटी 30 लाख जणांनी नोंदणी करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर ही नोंदणीसाठी शेवटची तारीख होती. या योजनेला मुदतवाढ देण्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकृदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने महत्वकांक्षी लाडकी बहीण योजना सुरु केलीया आहे.
ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाला ही योजना सुरु करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्टपासूनच पैसे मिळायला सुरुवात झाली होती. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभेला बहुमत प्राप्त झाले असं म्हटलं जातं. महिलांना आतापर्यंत पाच हफ्ते देण्यात आले आहे. आता सहाव्या डिसेंबरच्या हफ्ताचं वितरण देखील सुरु झालं आहे.
बहिणींचा वर्षाचा शेवटही गोड..
बहिणींचा वर्षाचा शेवटही सरकारनं गोड केला आहे. या योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतीम तारीख 15 ऑक्टोबर होती. नोंदणीसाठी मुदतवाढ द्यायची का? याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे, असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
- जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे 7,500 दिवाळीपूर्वी जमा केले.
- 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी.
- त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले.
- पुणे, पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणी हजारो अर्ज बाद
- डिसेंबरचा हफ्ता मिळण्यास सुरुवात
- 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ
- आधार लिंक झालेल्या 12 लाख नव्या लाभार्थ्यांनाही हफ्त्याचे वितरण
- नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार