पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, कोल्हापूर जिल्हा परिषदेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 ही असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpkolhapur.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर.
– रिक्त पदे : 02 पदे.
– वयोमर्यादा : खुला प्रवर्ग: 38 वर्षे, राखीव वर्ग: 43 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा 25 हजार
– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– अर्ज पाठवण्याचा पद्धत : ऑनलाईन.
– परीक्षा शुल्क : मागास प्रवर्ग-२००/- , खुला प्रवर्ग-४००/-
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024.
– परीक्षेचा दिनांक : 10/10/2025.