पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरतीसंबंधी मुलाखत ही ३१ ऑक्टोबरला होणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कुठं होणार भरती?
– इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
कोणत्या पदांवर भरती?
– वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही भरती केली जात आहे.
एकूण किती पदांवर होणार भरती?
– या भरती प्रक्रियेंतर्गत 5 पदे भरली जाणार आहेत.
नोकरीचे ठिकाण?
– नागपूर हे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
– ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
– संबंधित उमेदवाराला 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकणार आहे.
कुठं पाठवायचा अर्ज?
– इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर-440018.
कुठं होणार मुलाखत?
– अधिष्ठाता यांच्या कार्यालयात, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीए रोड, नागपूर-440018.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.iggmc.org/ वर जाऊन माहिती घेता येऊ शकणार आहे.