पुणे : ‘इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’ अर्थात IDBI बँकेत भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1,05,280 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
IDBI बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक-ग्रेड बी. या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक (एजीएम) – ग्रेड सी आणि व्यवस्थापक – ग्रेड बी.
– एकूण रिक्त पदे : 56 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, पदव्युत्तर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 64,820/- ते रु. 1,05,280/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.