पुणे : साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
यामुळे आता भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हाताने स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे. व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देण्याचा दिला जाणार असल्याने साईंची आरती सुरु असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा देखील करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. साईबाबांच्या समाधी समोर लावण्यात आलेल्या काचांमुळे भक्तांना समाधीला स्पर्श करुन दर्शन घेता येत नव्हते. त्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
मात्र मंदिर संस्थान प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने आता पुन्हा एकदा बाबांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.