उरुळी कांचन, (पुणे) : साधे पेट्रोल उपलब्ध असतानाही नागरिकांना वाढीव ८ रुपये दराचे बळजबरीने पावरचे पेट्रोल दिले जात असल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील साबणे पेट्रोलीयम या पंपावर हि घटना मगील एक महिन्यापासून घडत आहे. एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांचे लाखो रुपये वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत साबणे पेट्रोलीयम या नावाने पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी साधे व पावरचे असे दोन्ही पेट्रोल मिळते. मात्र सदर पेट्रोल चालकाने मागील एक महिन्यापासून उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता साध्या पेट्रोलपेक्षा पावरचे पेट्रोल देण्याचा बळजबरीने प्रकार सुरु केला होता. साध्या पेट्रोलपेक्षा ते पेट्रोल एका लिटरला आठ रुपये जास्त प्रमाणात आहे.
यावेळी हि गोष्ट उरुळी कांचन येथील तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार कांचन यांनी समजली तेव्हा त्यांनी सदर पेट्रोल पंपावर जाऊन साधे पेट्रोल असूनही का देत नाही अशी विचारणा केली. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले कि, मागील काही दिवस पंपाचे काम सुरु होते. त्यामुळे पावरचे पेट्रोल देण्यात येत होते. अशी माहिती देण्यात आली. कांचन या पुढे म्हणाले कि या पुढे असा प्रकार आढळून आल्यास पेट्रोलपंप परिसरात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्यात येईल. व नागरीकांची लुट झाली तर पेट्रोलपंप या परिसरांत चालु न देण्याचा ईशारा दिला.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना पावरचे पेट्रोल दिले जाते कि, साधे पेट्रोलच पावर म्हणून दिले जात होते. अशी चर्चा उरुळी कांचनसह परिसरात सुरु झाली आहे. त्यामुळे सदर पंपचालकाची चौकशी करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
याबाबत कांचन म्हणाले, “पेट्रोल पंप चालकाकडे साधे पेट्रोल उपलब्ध असते. परंतु पेट्रोल संपले आहे असे सांगून नागरिकांकडून जास्तीचे ८ रुपये किमतीने जास्त प्रमाणात असलेले पेट्रोल नागरिकांना दिले जाते. पेट्रोल टाकताना कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना जास्त प्रमाणावर पैसे द्यावे लागत होते.
याबाबत पेट्रोल पंप चालक सचिन साबणे यांना मोबाईल फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद असल्याच्या कारणावरून संपर्क होऊ शकला नाही.