पुणे : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी. सेंट्रल बँकेत फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडन्स / सब स्टाफ आणि वॉचमन कम गार्डन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2025 आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
फॅकल्टी पदासाठी 22 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. ऑफिस असिस्टंट पदासाठी 22 ते 40 वयोगटातील तर अटेंडन्स सब स्टाफ पदासाठी 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे तुम्ही अधिकृत वेबसाईट centralbankofindia. co.in यावर जाऊन अर्ज करू शकता.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड इंटरव्यूद्वारे होणार आहे याबाबत अंतिम निर्णय समिती घेणार आहे. या नोकरीसाठी अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार फॉर्म भरावा. हा अर्ज क्षेत्रीय प्रबंधक/ अध्यक्ष एलएसी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय..पहिला मजला पटेल चौक HPO जवळ पिन कोड 8411 226 इथे अर्ज पाठवायचा आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा.