पुणे : तुम्हाला चांगली नोकरी हवीये? तर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे तुम्हाला संधी मिळू शकते. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रजिस्ट्रार आणि हाउस ऑफिसर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 81,572 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : रजिस्ट्रार आणि हाउस ऑफिसर.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 80,757/- ते रु. 81,572/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 33 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ते 10 जानेवारी 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आणि H.O.D. (से. हेल्थ केअर सर्व्हिसेस), के.बी. भाभा हॉस्पिटल, वांद्रे (पश्चिम), आर.के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.