पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर येथे सीए अर्थात सनदी लेखापाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 29 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– कोणत्या विभागात भरती? : महिला आर्थिक विकास महामंडळ
– पदाचे नाव : सनदी लेखापाल.
– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 डिसेंबर 2023.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2023.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ, जि. चंद्रपूर, हॉल क्र. 12, प्रशासकीय इमारत, बस स्टॉपसमोर, चंद्रपूर – 442401.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://womenchild.maharashtra.gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.