पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. ही अर्ज प्रक्रिया ऑफलाइन , ऑनलाइन (ई-मेल)च्या माध्यमातून असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कुठं निघाली भरती?
– डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
कोणत्या पदावर भरती?
– संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी.
किती पदे भरली जाणार?
– या भरती प्रक्रियेंतर्गत विविध पदे भरली जाणार.
नोकरीचे ठिकाण काय असेल?
– पुणे येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय असावी?
– पीएच.डी., पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी पदवी.
अर्ज करण्याची पद्धत?
– ऑफलाइन , ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 13 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2024.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकारामनगर, पिंपरी, पुणे 411 018
– अर्ज पाठवण्याचा ई-मेल : [email protected]
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://dpu.edu.in/ वरून घेता येणार आहे.