पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहेत. त्यात आता बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याने प्रति औंस $2,400 पेक्षा जास्त उसळी घेतली होती. पण आता सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मार्चनंतर एप्रिल महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी सुरु झाली आहे. त्यात लग्नसराईही सुरु आहे. त्यामुळे दर वाढो किंवा कमी होवो हा व्यापार सुरुच राहणार आहे. गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजारांनी महागले होते. तर चांदीच्या दरात 430 रुपयांची घसरण झाली होती. मात्र, आता या आठवड्यात सोमवारी सोने 550 रुपयांनी उतरले.
असे असताना पुण्यात आता 22 कॅरेट प्रतितोळे सोने 66,530 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 71,880 रुपये हा सध्याचा दर सुरु आहे. तर चांदी 82,100 रुपये प्रतिकिलो दर झाला आहे. हा दर मागील दराच्या तुलनेत कमी असल्याने एकप्रकारे घसरणच झाल्याचे सांगितले जात आहे.