Gold Silver Rate Today : पुणे : सोने-चांदीचे आजचे 4 मे 2023 रोजीचे दर हे वाढले आहेत. जुना रेकॉर्ड इतिहासजमा केला नाही, तर नवीन रेकॉर्ड पण केला आहे. दोन्ही धातूंच्या किमतींनी उंच झेप घेतली आहे. सोने-चांदीच्या नवीन दरांमुळे ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. सोने आता 63 हजारांच्या दिशेने वाटताल करत आहे. तर चांदी 77 हजारांच्या दिशेने आगेकूच करत आहे.
14 कॅरेट सोने 36,638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, 18 कॅरेट 46,972 रुपये, 22 कॅरेट सोने 57,368 रुपये, 23 कॅरेट 62,378 रुपये 24 कॅरेट सोने 62,629 रुपये झाले. एक किलो चांदीचा भाव 75,700 रुपये झाला.
सोने-चांदीची जोरदार मुसंडी
आज सोन्याचा भाव 62,629 रुपयांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे चांदी पण चमकली आहे. एक किलो चांदीसाठी 75,700 रुपये मोजावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, चांदी अजून जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये अशी होती. आज पुन्हा भाव वर गेला आहे.
63,530 रुपये किंमत
दिवाळीपासून गेल्या आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले होते. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. 29 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 820 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची गगन भरारी
आज किंमत 75,000 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीची गगन भरारी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू आहे. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. 29 नोव्हेंबर रोजी भावात 700 रुपयांची वाढ झाली.