पुणे : मौल्यवान धातूंच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोने -चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिश्याला आज कात्री लागणार आहे.आज बाजार उघडताच सोन्याच्या भावाने अचानक मोठी उसळी घेतली. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र कोणतीही हालचाल न होता ते स्थिर राहिले आहेत.24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 770 रुपयांची वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल 770 रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1,43,570 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 24 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 7700 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला 14,35,700 रुपये खर्च करावे लागणार आहे.

तसेच 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला 1,31,600 रुपये खर्च करावे लागतील. तर 22 कॅरेटच्या 10 तोळा सोन्याच्या दरामध्ये 7000 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला 13,16,000 रुपये खर्च करावे लागतील.18 कॅरेटचा 1 तोळा (10 ग्रॅम): 570 रुपयांच्या वाढीसह नवीन दर 1,07,670 रुपये झाला आहे.

आज सोन्याचे दर वाढले पण चांदीचे दर स्थिर आहेत. आज 1 ग्रॅम चांदी 235 रुपयांना विकली जात आहे. 1 किलो चांदी 2,35,000 रुपयांना विकली जात आहे.सोन्याच्या किमती भडकल्या असल्या तरी चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.







