Gold Rate Dropped : पुणे : सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ५९,५६० रुपये झाली आहे. मे २०२३ मध्ये सोन्या आणि चांदीच्या विक्रमी दरवाढीनंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पडझड सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढउतार होत असताना त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही होत आहे. (Gold price has dropped again, know today’s rate)
पंधरवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण
आज चांदीचा दर चांदी ७१,३४० रुपये प्रति किलो आहे. गेल्या पंधरवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरु आहे. (Gold Rate Dropped ) २४ मे आणि २० मे हे दोन दिवस वगळता सोने-चांदीने उसळी घेतली नाही.
जाणून घ्या शहरांनुसार सोन्याचे दर
मुंबई – २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५९७ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,५६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे – प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५९७ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५६० रुपये असेल.
नाशिक – २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५९७ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५६० रुपये आहे.
नागपूर – प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५९७ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५६० रुपये इतका आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून तरुणाची खडकवासला धरणात उडी घेत आत्महत्या
Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा
Pune News : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ’उजास’ उपक्रमांतर्गत पथनाट्य सादर