शिरूर : शिरूर येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटाच्या दोन्ही संघांनी जिल्हास्तरीय “रग्बी स्पर्धेत” सुवर्णपदकाची पटकावल्याने त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे, अशी माहिती शाळेचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांनी दिली.
जिल्हास्तरीय “रग्बी स्पर्धा” आझम कॅम्पस, पुणे या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील १४ व १७ वर्ष वयोगटातील संघ सहभागी झाले होते. रग्बी हा एक सांघिक खेळ असून पंधरा – पंधरा खेळाडुंच्या दोन संघामध्ये खेळला जातो.
या स्पर्धेत बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या १४ व १७ वर्ष वयोगटातील दोन्ही संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन्ही वयोगटातील स्पर्धक खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविलेणे विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
दरम्यान, विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. रग्बी या खेळाचे प्रशिक्षक ओंकार शेळके यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून त्यांचा सराव करुन घेतला. शाळेचे प्राचार्य गणेश मिटपल्लीवार यांनी विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.