पुणे : रेल्वेने स्थानके, विभाग, डेपो, कार्यशाळा, शेडमधून भंगार हटविण्याची मोहीम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली होती. त्या मोहिमेंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाला भंगार विक्रीतून ३४९.९९ कोटी इतका महसूल मिळाला असल्याने रेल्वेसाठी भंगाराच सोने ठरले.
आतापर्यंत रेल्वेला भंगार विक्रीतून मिळालेला हा महसूल सर्वाधिक आहे. सन २०२१ साली भंगार विक्रीतून रेल्वेला ३३३.९८ कोटी रुपयांचा महसूल मिळाले आहे. यावर्षी या महसुलात सुमारे १६ कोटी रुपयांची म्हणजेच ४.७९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
या भंगाराची विल्हेवाट लावल्याने रेल्वेचा परिसर देखील स्वच्छ व पर्यावरण पूरक होण्यास मदत झाली आहे. ऑटोमोबाईल उत्पादन वाहतुकीचा नवा उच्चांक रेल्वेच्या पुणे विभागाकडून ऑटोमोबाईल उत्पादने चिंचवड, खडकी आणि लोणी स्थानकांवरून पाठवली जातात. डिसेंबर २०२२ मध्ये चिंचवड , खडकी आणि लोणी स्थानकांवरून ८६ मालगाड्यांमधून ऑटोमोबाईल उत्पादनांची वाहतूक पुणे विभागाने केली. त्याद्वारे रेल्वे प्रशासनाला १३.८० कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे. यात चिंचवड स्थानकावरूनच फक्त ५३ मालगाड्या भरल्या गेल्या.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग , वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ . मिलिंद हिरवे आणि वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक डॉ . स्वप्नील निला यांच्या नेतृत्वाखाली बिझनेस डेव्हलपमेंट युनिट टीमच्या संयुक्त प्रयत्नाने हे शक्य झाले असल्याचे प्रशासनाने सांगितले