मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढउतार पाहिला मिळत आहे. त्यात भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत सोमवारी घट दिसून आली आहे. सोन्याचा भाव 76 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला असला तरी यामध्ये कपात झाल्याचे दिसून आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घट नोंदवण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 76,296 रुपये झाली. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 87430 रुपये प्रति किलो आहे. 99.5 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 75990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 69887 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 57222 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 44633 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान, सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासली पाहिजे. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. भारतात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 69887 असल्याचे दिसून आले.
असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…
पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 76,720 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत मोठ्या फरकाने कमी झाली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 71,010 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 89,400 रुपयांवर गेले आहेत.