पुणे : दररोजच्या धगाधगीच्या जिवनात काहितरी विरंगुळा, आनंद, समाधान मिळावे यासाठी प्रत्येकजण नवीन काहीतरी प्रयोग करत असतो. त्यात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनमुराद आनंद घेण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. गिर्यारोहन, गड किल्ले असो वा समुद्रकिनारी ऋुतूप्रमाणे पर्यटनाची ठिकाणे बदलत असतात. पर्यटन करत असताना प्रत्येक्ष ठिकाणांची माहिती असणे गरजेचे असते. चुकीच्या माहितीतून प्रत्येक्ष ठिकाणावर आवाहन स्पर्धा करत आपन आयुष्याशी खेळत तर नाही ना? याचा विचार करावा. समुद्रकिनारी, गडकिल्लांवर घडलेल्या अपघातातून गेलेले बळी याचा अनुभव पाठिशी असावा. अन्यथा पुन्हा पुन्हा त्याच घडना घडण्यासाठी आपणच त्याला कारणीभूत ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे.
योग्य वातावरण योग्य पर्यटन…
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शैक्षणिक सहलीपासून ते खासगी मित्र परीवारामधून निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी नेहमीच धडपड असते. पावसाळ्यात धबधबे पहाण्यासाठी व पावसाचे तुषार अंगावर घेण्यासाठी काही पाऊस प्रेमी पहावयास मिळतात. थंडीच्या दिवसात कुडकुडणाऱ्या थंडीचा तसेच या काळात खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांना काहि पर्यटन प्रेमी महत्व देतात. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला गारवा मिळण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांवर पर्यटक गर्दी करत असतात. नवीन लग्न झालेल्या जोडप्यामध्ये अशा पर्यनाला अधिक महत्व दिले जाते. त्यामुळे पर्यटन स्थळी या नवविवाहित जोडप्यांची गर्दी देखील पहावयास मिळते. हे पर्यटन आनंद , समाधान मिळविण्यासाठी असते. प्रत्येक पर्यटन ठिकाणांची पुर्ण माहिती घेऊनच तेथील आनंद घेतला पाहिजे. अन्यथा एखादा प्रसंग जिवावर बेततो त्यातून ते हसरे कुटूंब दुखाःच्या छायेत कोसळले जाते.
सुचनांचे पालन करा…
बहुतेक वेळा संपुर्ण कुटूंबासमवेत पर्यटन करण्याकडे अधिक कल असतो. त्यातून मिळणारा आनंद सर्वांना मिळावा हाच उद्देश असतो. पण पर्यटनाच्या माहिती बरोबर तेथील दिलेल्या सुचनांचे पालन न केल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. यात नेमका दोष कोणचा हे ठरविणे अवघड जाते. पुणे येथील बुशी डॅब वर पावसाळ्यात घटना घडली. यामध्ये संपुर्ण कुटूंब धबधब्यामध्ये वाहून गेल्याने त्या कुटूंबाचे पुढे काय झाले हे मात्र कळालेच नाही. यासाठी पर्यटन स्थळावरील सुचनांचे पालन करणे गरजेचे असते. गड किल्लांवर दरीत पडून अपघात झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अंधारात रस्ता चुकून अपघात घडले आहेत. सेल्फीच्या नादात गडावरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. खरे तर याला कारणीभुत आपनच आहोत. हे मात्र विसरून जमणार नाही.
अपघाताच्या घटना घडतच आहेत…
शिरूर तालुक्यातील मुख्यध्यापक धमेंद्र देशमुख त्यांच्या १३ सहकाऱ्यांसमवेत 27 डिसेंबर ला अलिबाग येथील काशीद बिच समुद्रकिनारी गेले होते. समुद्रात सर्वजण पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने देशमुख पाण्यात बुडू लागले. दरम्यान समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक दलाने देशमुख यांना पाण्यातून बाहेर काढले. प्राथमिक आरोग्य केद्रानंतर जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारा अगोधर त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आहे. यासाठी पर्यटनाच्या ठिकाणी असणाऱ्या अपघाती जागा, अपघाता नंतरची सुविधा, आरोग्य केंद्र तसेच जीव रक्षक टिमचा संपर्क या सगळ्या बाबींची माहिती असणे गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात येते.
पर्यटन ही गोष्ट आपल्या आनंदासाठी आहे. त्यातून कुटूंबासमवेत आनंद मिळवायचा असेल तर जबाबदारीने वागा. ज्या ठिकाणी विश्वासाने जबाबदारीने पर्यटन करण्याची संधी असेल अशाच ठिकाणी जा. अपघात टाळण्यासाठी पर्यटन ठिकाणच्या सुचना तंतोतत पाळा. समुद्र किनारी माहिती घेऊन तसेच तेथील जीवरक्षक टिमला माहिती देऊन प्रवेश मिळवा. पर्यटनातून आनंद मिळवा अपघात नाही. असे घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी सांगितले.