पणजी: गोव्यातील अर्पोरा येथील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये शनिवारी 6 डिसेंबरला मध्यरात्री भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली. यात जवळपास 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Goa Nightclub Fire Video)

या घटनेचा व्हीडीओ समोर आला आहे. यात भयंकर स्फोट होऊन आग लागल्याचे दिसत आहे. स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हीडीओ पत्रकार भारती रंजन यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर पोस्ट केला आहे.
पहा Video..
🔴 BREAKING | Goa Nightclub Tragedy – 23 Dead
A massive fire broke out at Birch by Romeo Lane in North Goa’s Arpora late Saturday night, killing 23 staff members trapped inside.
The blaze is suspected to have started in the kitchen, possibly triggered by a cylinder blast,… pic.twitter.com/cZvgsY0wVW— Bharathirajan (@bharathircc) December 6, 2025







