पुणे : वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचे दर ३० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सरकारच्या आदेशानंतर अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारने फॉर्च्युन ऑइलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने खाद्यतेलाच्या किमती एका झटक्यात ३० रुपयांनी कमी केल्या आहेत. आज सोमवारी ही घोषणा करण्यात आली.
सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. यापूर्वी, धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रान ऑइलच्या किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती. नुकतेच केंद्राच्या मोदी सरकारने एडिबलऑइल असोसिएशनला तेलाच्या किमती लवकरात लवकर कमी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशात सरकारने तेल कंपन्यांना तात्काळ प्रभावाने प्रतिलिटर 15 रुपयांनी दर कमी करण्यास सांगितले होते.
नवीन किंमत अशी आहे:
या कपातीनंतर फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या कंपनीने सोयाबीन तेलाच्या किमती 195 रुपये प्रति लीटरवरून 165 रुपये प्रति लीटरपर्यंत कमी केल्या आहेत.सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. त्याचबरोबर मोहरीच्या तेलाची एमआरपी 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये करण्यात आली आहे.
याशिवाय, कंपनीने फॉर्च्यून राइस ब्रॅन ऑइलची किंमत प्रति लीटर 225 रुपये वरून 210 रुपये प्रति लीटर केली आहे.शेंगदाणा तेलाची किंमत 220 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. तसेच, राग वनस्पतिची किंमत प्रति लिटर 200 रुपये वरून 185 रुपये प्रति लिटर, तर राग पामोलिन तेलाची किंमत 170 रुपये प्रति लीटरवरून 144 रुपये प्रति लिटर इतकी कमी करण्यात आली आहे.