राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळानी पारंपरिक वाद्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अभ्यासिका, आरोग्य शिबीर, आदि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच ग्रामसुरक्षा दल व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे मत यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.
यवत (ता. दौंड) येथे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळ व पदाधिकाऱ्यांची यवत येथील समृद्धी गार्डन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण पवार बोलत होते. यावेळी विविध गावाच्या पोलीस पाटलांनी मात्र पाट फिरविल्याने पोलिसांनी मात्र नाराजी व्यक्त केली.
यापुढे बोलताना पवार म्हणाले, ” मंडळांनी गणपती स्टेज सुस्थितीत उभारणे, लाईट व्यवस्था करताना शॉर्टसर्कीट होणार नाही याची काळजी घ्यावी ठरवून दिलेल्या दिवशी स्पीकर सुरु ठेऊ नये. गणपती साठी परवानगी घेणे गरजेचे असुन सर्व मंडळाली अर्ज करुन परवानगी घ्यावी. विना परवानगी मंडळावर कारवाई होऊ शकते मंडळाची धर्मादाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करणे आवश्यक असुन वर्गणी ऐच्छिक घ्यावी, जबरदस्ती करु नये विसर्जन मिरवणूक नेहमीच्याच मार्गाने व्हावी, गटबाजी होणार नाही याची काळजी घ्यावी.
दरम्यान, विसर्जन स्थळी लाईटची व्यवस्था, सेफ्टी जॉकेटसह आवश्यक ती खबरदारी घ्यावी डी.जे वापरला पुर्णपणे बंदी असुन डी.जे चा वापर केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल डी.जे ऐवजी दोन स्पिकर, बँन्जो, पारंपरिक वाद्य, यांचा वापर करावा याबरोबरच मंडळांनी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अभ्यासिका, आरोग्य शिबीर, आदि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत
ग्रामसुरक्षा दल व तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी तरुणांनी प्रयत्न करावेत.
यावर्षी एक गाव एक गाणपती करणाऱ्या गावास बक्षिस व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल. यावेळी उपनिरिक्षक केशव वाबळे, पद्मराज गंपले यांसह पोलिस पाटील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.