फुरसुंगी, ता. 23 : पुणे शहरात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान खंडणी विरोधी पथक-२ ने धडक कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले. खंडणी विरोधी पथक दोनचे अधिकारी व अंमलदार बुधवारी (ता. २२) केली आहे. या घटनेमुळे फुरसुंगी परिसरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीनांकडून शस्त्र बाळगण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Fursungi News

पोलीस आयुक्तालयाकडून १८ ते २४ एप्रिलदरम्यान अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार २२ एप्रिल रोजी परीमंडळ ६ हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार नितीन मुंढे यांनाआदर्श नगर ते उरुळी देवाची मार्गावरील कच्च्या रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत एक इसम कंबरेला गावठी पिस्टल लावून संशयास्पदरीत्या फिरत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. Fursungi News
पोलिसांना पाहताच संबंधित इसमाने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो विधीसंघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. संबंधित बालकाविरुद्ध यापूर्वीही पुणे शहरात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारीचा वाढता कल चिंताजनक ठरत असून, अशा बालकांच्या मागे कोणते मोठे गुन्हेगारी रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. Fursungi News
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, दयानंद गायकवाड, प्रदीप परीट यांच्या पथकाने केली आहे. Fursungi News






